विविध कर्ज योजना
कृषि यांत्रिकीकरण –
- 50% कर्ज पुरवठा कर्जाची मुदत 7 वर्षे तारण – किमान – 12 एकर पैकी 5 एकर बागायत किंवा 8 एकर बागायत (बारमाही)
शेतकरी निवास -
- सर्व सामान्य व गरीब शेतकऱ्यांना शेतकरी निवास बांधकामास मिळकत रकमेचा किंवा इस्टीमेटच्या 80% जास्तीत जास्त 4.00 लाखापर्यंत कर्ज पुरवठा, कर्ज मुदत 10 वर्षे वार्षीक समान 10 हप्ते द.सा.द.शे.13% दराने दरमहा व्याज भरणा करावे लागेल,तसेच घरावर व 5 एकर जमीनीवर रजिष्टर गहाणखत स्व:खर्चाने नोंदवावे लागेल.
मळणीयंत्र –
- मळणीयंत्र खरेदीसाठी किंमतदर्शक कोटेशनच्या 85% कर्ज, मुदत 5 वर्ष, तारण किमान 5 एकर पैकी 2 एकर बागायत
ग्रामीण गोदाम योजना –
- 100 मे.टन क्षमतेचा गोदामासाठी प्रतिटन रु.2000/- खर्च गृहीत धरुन एकूण प्रकल्प खर्चाचे 75% किंवा प्रत्यक्ष खर्चाचा 75% यापैकी कमी रक्कम कर्ज उपलब्ध होईल.
गृहपयोगी कर्ज (कन्झमशन कर्ज )-
- जिल्हयातील सर्व सोसायटीचे किसान क्रेडीट कार्ड धारक सभासदांना पिक कर्जाव्यतिरिक्त शेतीपुरक अगर घरगुती कारणासाठी जास्तीत जास्त रु.50,000/- पर्यंत कर्ज पुरवठा किंवा पिक कर्जाच्या 50% कर्ज,मुदत - 1 वर्ष.
स्वयंसहायता बचत गट (Self Help Group) –
- धुळे व नंदुरबार जिल्हयासाठी ग्रामीण भागातील बचत गटांच्या गुणात्मक क्षमतेनुसार व मागणीनुसार सभासदांच्या आर्थिक गरजा व स्वयंरोजगार निर्मितीसाठी गटाच्या बचतीच्या 1:1 ते 1/4 या (रु.10,000/- ते 5,00,,000/- लाखापर्यंत ) कर्ज पुरवठा उपलब्ध. कर्ज पतरफेड मुदत 12 महिने ते 24 महिने व्याजासह समान मासिक हप्त्याने.
जलसिंचन सुविधा –
- पाईपलाईन खरेदीसाठी एकरी रु.16,000/- जास्तीत जास्त रु.80,000/-,विहीर दुरुस्तीसाठी रु.35,000/-, इलेक्ट्रीक मोटार 3 एच.पी.साठी रु.16,000/-, 5 एच.पी.साठी रु.20,000/-, 7 एच.पी.साठी रु.22,000/- सब-मर्शिबल पंप रु.40,000/- व टयुबवेल / बोअरवेलसाठी रु.40,000/- कर्जाची मुदत 5 वर्षे, तारण किमान 8 एकर.
कांदा चाळ –
- कृषिपणन मंडळ पुणे यांचे प्लॅनप्रमाणे 10 ते 50 टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी रु.51,000/- पासून रु.2,55,000/- पर्यंत कर्ज पुरवठा 5 वर्षे परतफेड कांदा पिकाखाली क्षेत्रानुसार कांदा चाळीस कर्ज पुरवठा.
हॉटेल व्यवसाय –
- व्यावसायीक कोणत्या प्रकारचे हॉटेल चालवितात याचा प्रथम कृती आराखडा तयार करुन दैनिक खादयपदार्थाची होणारी किंमत होणारी विक्री त्याचप्रमाणे हॉटेलवर होणारा खर्च लक्षात घेऊन परतफेड क्षमता निश्चित करुन रु.20,000/-पासून जास्तीत जास्त रु.50,000/- पर्यंत कॅश क्रेडीट कर्ज मुदत 1 वर्ष परतफेड मुदतीने व्याजासह मासिक हप्त्याने.
ठिबक जलसिंचन योजना-
- शेती-विकासासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचन योजनासाठी एकरी 12 एम.एम.ठिबकसाठी रु.31,000/-, 16 व 25 एम.एम.साठी रु.41,000/- पर्यंत कर्ज पुरवठा, कर्ज मुदत 5 वर्ष.
दुचाकी वाहन खरेदीसाठी –
- बँकेच्या कार्यक्षेत्रातील पगारदार नोकरांना कॅश क्रेडीट पध्दतीनुसार दुचाकी वाहनात मोटार सायकल, स्कूटर, मोपेड इ.समावेश राहील. अधिकृत डिलरने दिलेल्या दुचाकी वाहन किंमतीच्या (कोटेशन प्रमाणे) 80% अथवा रु.40,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल तितके वाहन कर्ज मंजूर करण्यांत येईल. परतफेड 3 वर्षे मासिक व्याजासह हप्त्याने.
नविन चार चाकी वाहन खरेदीसाठी –
- बँकेच्या कार्यक्षेत्रातील सदन शेतकरी, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, पगारदार नोकर यांच्यासाठी कंपनीच्या प्राईज लिस्टच्या 85% किंवा रु.10.00 लाख जी रक्कम कमी असेल तितके वाहन कर्ज मंजूर करण्यांत येईल. कर्जाची परतफेड 5 वर्ष असुन दरमहा समान व्याजासह मासिक हप्त्याने.
इंजिनिअर –
- सिव्हील इंजिनिअर सरकारमान्य नोंदणीकृत व्यावसायीक असले पाहीजेत त्यानुसार त्यांना बांधकामाबाबत जे कंत्राट मिळाले ते कामकाज पुर्ण करणेसाठी बँक त्यांना मंजूर असलेल्या कंत्राटी रकमेच्या 80% त्या कालावधीपर्यंत कर्ज कमीत कमी रु.5.00 लाख जास्तीत जास्त रु.25.00 लाख कर्ज परतफेड मासिक हप्त्याने (व्याजासहित)
मिल्कींग मशीन –
- गाई / म्हशी डेअरी युनिटसाठी मिल्कींग मशीन खरेदीसाठी कोटेशनच्या 85%, मुदत 5 वर्षे, तारण – 1 ते 5 एकर जिरायत अगर 2 एकर बागायत.
खडी क्रेशर व्यवसाय –
- खडी क्रेशर व्यवसाय करण्यासाठी स्वत:ची जागा कमीत कमी 10,000/- व जास्तीत जास्त 15000 चौ.फुट असणे आवश्यक 1) कर्ज मर्यादा जास्तीत जास्त रु.25.00 लाख 2) मुदत- 5 वर्षे कॅश क्रेडीट पध्दतीने दरमहा व्याजासह हप्ता.
कॅश क्रेडीट माल तारण –
- जिल्हयातील कायम रहिवाशी असणारे उद्योजक / व्यापारी, व्यावसायीक यांना मालाच्या तारणावर व्यवसायातील उलाढाल लक्षात घेऊन शिल्लक मालाचा किंमतीच्या 80% व जास्तीत जास्त रु.25.00/- लाखापर्यंत कर्ज मुदत 1 वर्ष.
मेडीकल स्टेाअर्ससाठी कर्ज पुरवठा –
- ड्रग इस्पेक्टर लायसन्स स्टोअर्स साधारण सहा महिन्यात केलेली खरेदी / विक्री, शिल्लकसाठा, व्यापारी नफा सर्व प्रकारचा खर्च वजा जाता निव्वळ नफा, कर्जदारांची कर्ज परतफेड क्षमता विचारात घेऊन शिल्लक साठयाच्या 80% व होणाऱ्या दैनंदिन विक्रीचा विचार करता जास्तीत जास्त रु.3.00 लाख कॅश क्रेडीट कर्ज मुदत 1 वर्ष कर्ज परतफेड दरमहा मासिक हप्त्याने (व्याजासह)
डॉक्टर –
- सर्जन/ फिजीशियन / व्यवसायाबाबत प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा लागेल. हॉस्पीटल बांधकाम, मशिनरी खरेदी, फर्निचर इ.बाबत योग्य त्या व्यक्ती अथवा कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे इस्टीमेट अथवा कोटेशनच्या 80% अथवा जास्तीत जास्त रु.25.00 लाख कर्ज मुदत 5 वर्षे कर्ज परतफेड मासिक हप्त्याने (व्याजासह)
प्राथमिक (खाजगी) माध्यमिक व उच्च माध्यमिक नोकरांना वैयक्तीक अधिकर्ष –
- प्राथमिक (खाजगी) माध्यमीक व उच्च माध्यमीक नोकरांना त्यांना वेतनाशी निगडीत वैयक्तीक अधिकर्ष क्रेडीट कर्ज जास्तीत जास्त रु.2.00 लाखापर्यंत कर्ज मुदत 24 महिने द.सा.द.शे. 15% दराने कर्जाच्या दुप्पट मालमत्तेवर रजिष्टर गहाण खत तारणावर.
कापड दुकान / किराणा व स्टेशनरी कटलरी दुकान -
- शॉप ॲक्टखाली रजिस्टर लायसन्स धारकांना साधारण तीन महिन्यात केलेल्या खरेदी/विक्री, शिल्लक साठा प्राप्त झालेला व्यापारी नफा व्यवसायासाठी होणारा खर्च वजा जाता निव्वळ नफा व्यवसायीकांच्या परत फेड क्षमता विचारात घेऊन साठयाच्या शे.80% व होणाऱ्या विक्रीचा विचार करता जास्तीत जास्त 3 ते 5 लाखापर्यंत कॅश क्रेडीट पुरवठा कर्ज मुदत 1 वर्ष कर्ज परतफेड मासिक हप्त्याने (व्याजासहित)