धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध बँक

  • RPCD (MRO) 1618/18.01.038/2012-13
फोन नं. - ०२५६२ २८८३५०/५१/५२
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., धुळे
  1. जिल्हा बँकेची स्थापना दि.13 सप्टेंबर 1957 रोजी दोन्ही जिल्ह्यातील सहकारी संस्थाना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करून त्यांच्या सेाबत शेतकरी, ग्रामीण कारागीर, कामगार, मजुर, दारिद्र रेषेखालील स्त्री / पुरूष यांची आर्थिक उन्नती व त्यांचा विकास वृध्दींगत होवून त्यांनी सहकारमय जीवन जगावे यासाठी करण्यात आली.
  2. जिल्हा बँकेस भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या कडून `बँकिंग परवाना`नंबर RPCD(MRO)1618/ 18.01.038/2012-13 दि.26 एप्रिल 2013 रोजी `बँकिंग परवाना`मिळाला.
  3. जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र धुळे व नंदुरबार जिल्हा असून, बँकेच्या धुळे जिल्ह्यात 54 शाखा व नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भागासह 29 शाखा अशा एकूण 79  शाखा  आहेत. बँकेचे मुख्य कार्यालय, गरुड बाग धुळे येथे कार्यरत आहे.
  4. बँकेत 31 मार्च 2021 अखेर एकूण 376 कर्मचारी 97 कर्मचारी कराराने कार्यरत आहेत.
  5. बँकेचे एकूण भाग भांडवल मर्यादा रू.17500.00 लाख असुन दि.31 मार्च 2021 अखेर वसुल भाग भांडवल रू.11734.16. लाख आहे. त्यात राज्य शासन भाग भांडवल रू.3327.00 लाख आहे.
  6. बँकेचे मुक्त निधी : दि.31 मार्च 2021 अखेर बँकेचा मुक्त निधी रू.1984.76 लाख असुन त्यात वैधानिक राखीव निधी, कृषी पतस्थैर्य निधी, इमारत निधी, लाभांश समिकरण निधी, शासकीय कर्ज रोखे चढउतार घसारा निधी व विकास प्रकल्प लघुसिंचन निधी इ.चा समावेश आहे.
  7. दि.31 मार्च 2021 अखेर बँकेच्या एकूण ठेवी रू.60779.35 लाख आहेत. त्यात चालू ठेवी रू.16021.75 लाख बचत ठेवी रू.17861.37  लाख व मुदत ठेवीत रू.26896.23 लाख आहेत. चालू व बचत ठेवीचे म्हणजे कमी व्याजदराच्या ठेवी (CASA) एकूण ठेवीशी प्रमाण  55.75% आहे.
  8. दिलेले कर्ज (Loan Outstanding) बँकेचे दि.31 मार्च 2021 अखेर सर्व प्रकारचे एकूण येणे कर्ज रू.23949.55 लाख आहे. त्यात शेती पिक कर्ज येणे बाकी रू.8326.26 लाख आहे. तर बिगर शेती कर्ज येणे बाकी रू.13173.86 लाख आहे. तसेच इतर शेती कर्ज रू.1602.40 लाख आहे. तर  70  अवसायनातील संस्थाकडे रू.1958.08 लाख व डी.बी./आयबीपी यांचे रू. 0.00  लाख येणेबाकी आहे. 31 मार्च 2021 अखेर बँकेचा सी.डी.रेशो (ठेवीचे कर्जाशी येणे प्रमाण) 39.40% आहे.
  9. गुंतवणूक (Investment) : दि.31 मार्च 2021 अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रू.31362.58 लाख आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेस खालील अटीची कायम/दररोज पूर्णपणे पुर्तता करणे आवश्यक केले आहे जे नियम राष्ट्रीयकृत, सार्वजनिक व व्यावसायीक बँकांना लागू केले आहेत. तेच नियम व अटी जिल्हा बँकेस लागू केल्या आहेत.
  10. अ) बँकेने त्याच्या एकूण (एनडीटीएल) ठेवीच्या 41.68% रक्कम तरती जिंदगी (एसएलआर) गुंतवणूक सरकारी कर्ज रोख्यांमध्ये करावी. त्यानुसार बँकेने रू.11862.43 लाख सरकारी रोख्यात गुंतवणूक केलेली आहे. सदर गुंतवणूक रू.922.15 लाखांने बँकेने जास्त गुंतवणूक केली आहे. ब) बँकेने एकूण ठेवीच्या 3.5% रक्कम रोख रोखता निधी (सीआरआर) सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या करंट खात्यात शिल्लक ठेवण्यात येत आहे. क)  बँकेचे नक्त मुल्य(Net Worth) (+) ve सकारात्मक आहे. ड) दि.31 मार्च 2021 अखेर बँकेचा सीआरएआर 22.01% व  31 मार्च 2017 पासुन 9%पर्यंत राखणे बाबत रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे बँक सीआरएआर राखत आहे. दि.31 मार्च 2021 अखेर बँकेने विना तरती जिंदगी (नॉन एसएलआर) मध्ये रू.19500.15 लाख राष्ट्रीयकृत बँकेत अल्पमुदत ठेवीत गुंतवणूक केली आहे.
  11. कर्ज वसुली (Loan Recovery) : बँकेची दि.31/10/2020 अखेर एकूण अल्पमुदत मागणी रक्कम रू.23752.52 लाख असून दि.31/03/2021 अखेर अल्पमुदत कर्ज वसूली रू.16281.03 लाख म्हणजे मागणी कर्जाच्या 69%  वसुली झालेली आहे. तसेच मध्यम मुदत मागणी रक्कम रू.1125.67 लाख असून दि.31/03/2021 अखेर रू.101.74 लाख म्हणजे मागणी कर्जाच्या 9% वसुली झालेली आहे. बँकेचे बिगर शेती कर्ज मागणी रक्कम रु.11127.68 लाख असुन बँकेने रु.1194.42 लाख कर्ज वसुली केलेली आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण 11% आहे.
  12. प्रतिसेवक उत्पादकता (Per Employees Business) : बँकेचे दि.31 मार्च 2021 कायमचे 376 कर्मचारी  व कराराचे 97 असे एकुण 473 कर्मचारी कार्यरत होते. त्यानुसार बँकेची प्रति कर्मचारी उत्पादकता रू.179.13 लाख आहे.
  13. प्रति शाखा उत्पादकता (Per Branch Tern over) : बँकेच्या धुळे जिल्ह्यात  54  व नंदुरबार जिल्ह्यात 29 अशा एकूण 83 शाखा कार्यरत आहेत. त्यानुसार 31 मार्च 2021 अखेर बँकेचा प्रति शाखा उलाढाल रू.1020.83 लाख आहे.
  14. बँकेचे नक्त मुल्य (Net Worth) (+)ve सकारात्मक यावे व बँकेचा सीआरएआर 4% यावा यासाठी मार्च 2013 मध्ये राज्य शासनाने बँकेस रू.50.89 कोटी 10 वर्ष समान हप्त्याच्या परत फेडीवर दिले आहेत. त्यानुसार बँकेने मार्च 2021 अखेर रु.1800.00 लाख महाराष्ट्र राज्य शासनास शासन भाग भांडवल परत करण्यात आले आहे.
  15. अ) बँकेचे `अ`वर्ग सभासद महाराष्ट्र शासन असून महाराष्ट्र शासन भाग भांडवल रू.3327.00 लाख आहे. ब) बँकेचे `ब`वर्ग सभासद धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 3821 सहकारी संस्था सभासद असून संस्थानी रू.5000/- प्रमाणे बँकेच्या भागाची पूर्तता केली आहे. क) तसेच बँकेचे `ब`वर्ग  627  वैयक्तिक सभासद असून त्यांनी देखील रू.5000/- प्रमाणे बँकेच्या भागाची पूर्तता केली आहे.
  16. बँकेने 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 अखेर रू.19486.47  लाख खरीप पिक कर्ज  तसेच रु.2506.59 लाख अल्प मुदत बिगर शेती कर्जवाटप केले आहे. त्याच प्रमाणे रु.2156.38 लाख मध्यम मुदत व दिर्घमुदत कर्जाचे वितरण केलेले आहे.
  17. बँकेने एप्रिल 2020 ते मार्च 2021 अशा 12 महिन्यात रू.1250.50 लाख अनुत्पादक कर्ज वसुल केले आहे.
  18. बँकेचे दि.31 मार्च 2021 अखेर वैधानिक लेखा परिक्षण पूर्ण झाले असून त्यानुसार बँकेचे नक्त मुल्य (+) 3734.71 लाख असून बँकेचा लेखा परिक्षणानुसार (+)22.01% सीआरएआर राखलेला आहे. तसेच वैधानिक लेखा परिक्षक यांनी 31 मार्च 2021 अखेर बँकेस `ब` वर्ग प्रदान केला आहे.
  19. जिल्हा बँकेचे स्व:मालकीचे धुळे,शिरपुर,दोंडाईचा,पिंपळनेर,नवापूर,तळोदा,होळनांथे,कुसुंबा,वाडीभोकर रोड,शिंदखेडा, येथे ATM सेंटर कार्यान्वीत करण्यात आली आहेत.
  20. बँकेची स्व:मालकीची 2 ATM Mobile Van व्दारे, धुळे व नंदुरबार जिल्हयातील बाजारपेठेच्या गावांना तसेच ज्याठिकाणी बँकेच्या शाखा नाहीत, अशा ठिकाणी सर्व प्रकारच्या बँकींग सुविधा देण्यात येत आहेत.
  21. नाबार्ड चे अर्थसहाय्याने बँकेच्या 80 शाखांव्दारे ग्राहकांना मायक्रो अेटीएम (Micro ATM) ने सेवा प्रदान करण्यात आलेल्या असुन ग्राहक त्याचा लाभ घेत आहेत.