धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध बँक

  • RPCD (MRO) 1618/18.01.038/2012-13
फोन नं. - ०२५६२ २८८३५०/५१/५२
मा. श्री. राजवर्धनजी रघुजीराव कदमबांडे
अध्यक्ष

मी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आणि अनेक खडतर आव्हानाना आपल्या साथीने सामोरे जायचा निश्चय केला. परिस्थिती कशीही असो, मनस्थिती खंबीर असावी. माझा आत्मिक बळावर , अभ्यासावर आणि सततच्या प्रयत्नावर विश्वास आहे. बँकेची सद्यस्थिती कितीही कठीण असली तरी अशक्य असे काहीच नाही. आपण आणि आपल्यातील क्रयशक्ति , आत्मबल आपल्या संस्थेला आर्थिक दुष्टचक्रातुन निश्चीतच बाहेर आणू अशी माझी खात्री आहे.

बँकेचे ग्राहक हे आपले दैवत आहे. त्यामुळे बँकेची शाखा व शाखेच्या आजुबाजुचा परिसर हा देवालया प्रमाणे स्वच्छ असायला हवा. स्वच्छतेला प्रथम प्राध्यान्य द्यायला हवे. बँक हे एक कुटुंब असून या कुटुंबातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी परस्परात समन्वय ठेवून ग्राहकांना वक्तशीर व सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न करायला हवा. यापुढील काळात आपण सर्वानी जनतेमध्ये बँकेविषयी विश्वासार्हता वाढवण्याचे काम एक मिशन म्हणून हाती घ्यावयाचे आहे. मला कर्मचारी वर्गाचे प्रश्न व बँकेच्या समस्या जाणून घेऊन त्यात व्यक्तिगत लक्ष घालून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. यासाठी आपण ईच्छाशक्ति , क्रयशक्ति आणि जिद्ध पुरवलीत तर आपण ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊ शकू आणि आपल भविष्य नव्यान लिहु शकू

अधिकारी / कर्मचारी यांचेवर अन्याय होणार नाही याची मी कटाक्षाने काळजी घेणार आहे. आपण समाधानी राहिलात तर बँक उर्जितावस्थेत येईल याची मला जाणीव आहे. यापूर्वी बँक आर्थिक संकटात सापडले असता आपण सर्वानी अथक परिश्रमाने तोटा कमी करून बँकेला फायद्यात आणण्याचा प्रयत्न केला होता याची मला जाणीव आहे आणि त्याचे मला व्यक्तिशा कौतुक आहे. आपला ग्राहक हा अत्यंत सामान्य माणूस आहे आणि सामान्य तसेच तळागाळातल्या ग्राहकांची सेवा करण्याची संधी आपणास लाभली आहे. मग त्याना दर्जेदार सेवा देणे हे आपले कर्तव्य ठरते . व्यवसाय विश्वासावर चालतो आणि विश्वासाने चालत राहीले की यश हमखास मिळतच! थोड झटाव, झगडाव लागेल , पण खात्रीने आप ण यशाचा पैलतीर गाठू. जिद्ध, चिकाटी आणि श्रम आपल भविष्य घडवेल. आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वासाने असाध्य सुध्दा साध्य करता येऊ शकते. चला तर मग, विश्वासाचे एक पाउल पुन्हा नव्याने टाकु या , विश्वास निर्माण करू या, आपल्या ग्राहकांना घेऊन, या बँकेस पूर्वीचे वैभव मिळवून देण्यास कटिबद्ध राहू या.

धन्यवाद !